पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:13+5:302021-02-09T04:39:13+5:30

स्वच्छता अभियानात हवी गतिमानता देसाईगंज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून ...

Petrol thieves should be dealt with | पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

Next

स्वच्छता अभियानात हवी गतिमानता

देसाईगंज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून येत नाही. नाल्या, रस्ते व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने जागृती अभियान राबविण्याची मागणी आहे.

शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या

आरमाेरी : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़ परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टंचाईग्रस्त गावाचे सर्वेक्षण करावे

चामाेर्शी : तालुक्यातील काही गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने महिला चिंताग्रस्त आहेत. जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांची निगा राखण्यासाठी संबंधित विभागाने आराखडा तयार करावा.

दिव्यांगांचा ३ टक्के निधी कागदावरच

अहेरी : दिव्यांगांसाठी शासनातर्फे अनेक योजना सुरू आहेत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३ टक्के निधीची तरतूद करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी कागदावरच आहे. दिवसेंदिवस ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांचीही संख्या तालुक्यात वाढत आहे.

प्रखर दिव्यांमुळे अपघाताची धोका

आष्टी : दुचाकी वा चारचाकी वाहनांच्या पुढे दिवे (हेडलाईट) लावले जातात. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला

गडचिराेली : शहरात दिवसेंदिवस प्लस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

विहिरींचे अनुदान तातडीने द्यावे

आलापल्ली : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर केले होते. मात्र, अद्यापही अनुदान मिळाले नसल्याची ओरड आहे.

बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे

धानाेरा : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएलधारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिक विकासापासून वंचित आहेत.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

कुरखेडा : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्याचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी सरपंचांनी केली.

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

एटापल्ली : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावात व्यायामशाळाच नाहीत.

रस्त्यावरील रेडियम गायब

घाेट : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम लावण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत रेडियम गायब झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा

काेरची : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यावरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा

वैरागड : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्यस्थितीत या समित्या थंडबस्त्यात असल्याने वाद वाढत आहे.

नवीन वस्त्यात रानडुकरांचा शिरकाव

सिराेंचा : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माेहझरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिराेली : तालुक्यातील माेहझरी येथे मागील काही दिवसापासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फवारणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

मुलचेरा : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्या

कुरुड (काेंढाळा) : सध्या काही नागरिकांकडे सिलिंडर घेण्याइतके पैसे नसल्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. त्यामुळे जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तलावाचे सर्वेक्षण करावे

जाेगीसाखरा : जिल्ह्यातील मागील अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावाचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प

भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टीव्हीटीवर अवलंबून असल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात.

जिल्ह्यातील सौर दिवे दुरुस्त करावे

रांगी : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावात सौर पथदिवे सुरू केले. मात्र यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, काही सौर दिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

Web Title: Petrol thieves should be dealt with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.