पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:29+5:302021-09-02T05:18:29+5:30

गडचिराेली : शहरात मागील काही दिवसापासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच ...

Petrol thieves should be dealt with | पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

Next

गडचिराेली : शहरात मागील काही दिवसापासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

स्वच्छता अभियानात हवी गतिमानता

देसाईगंज : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गती नसल्याने लोकसहभाग दिसून येत नाही. नाल्या, रस्ते व सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने जागृती अभियान राबविण्याची मागणी आहे.

शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या

आरमाेरी : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही़ परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांना आळा घाला

गडचिराेली : शहरात दिवसेंदिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

बीपीएल यादीचे सर्वेक्षण करावे

धानाेरा : गोरगरिबांना धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी बीपीएलधारकांची यादी करण्यात आली आहे. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी सधन कुटुंबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक योजना कागदोपत्रीच असल्याने गरजू नागरिक विकासापासून वंचित आहेत.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

कुरखेडा : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्याचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी सरपंचांनी केली.

ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा

काेरची : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यावरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा

वैरागड : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्य:स्थितीत या समित्या थंडबस्त्यात असल्याने वाद वाढत आहे.

नवीन वस्त्यात रानडुकरांचा शिरकाव

सिराेंचा : शहरातील काही नवीन वस्त्यांमध्ये डुकरे मोकाट फिरत असल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: Petrol thieves should be dealt with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.