शारीरिक शिक्षकांनी खेळासाठी अतिरिक्त तासिका घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:40 AM2021-08-28T04:40:50+5:302021-08-28T04:40:50+5:30
बैठकीला जिल्हा क्रीडाधिकारी संदीप खोब्रागडे, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, सिरोंचाचे तहसीलदार हमीद सैय्यद, भामरागडचे अनमोल कांबळे, मुलचेराचे तहसीलदार ...
बैठकीला जिल्हा क्रीडाधिकारी संदीप खोब्रागडे, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, सिरोंचाचे तहसीलदार हमीद सैय्यद, भामरागडचे अनमोल कांबळे, मुलचेराचे तहसीलदार कपिल हाटकर, एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तालुका क्रीडाधिकारी जयलक्ष्मी ताटीकोंडावार आदी उपस्थित होते. आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी उपविभागातील प्रत्येक तालुकानिहाय क्रीडाविषयक आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. शारीरिक व आरोग्य तंदुरुस्तीसाठी क्रीडा व खेळ अत्यावश्यक असून खेळाची रुची व आवड शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षकांनी खेळाकरिता क्रीडा संकुलात सरावासाठी अतिरिक्त तासिका घेण्याचे निर्देश आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. क्रीडा संकुल असलेल्या ठिकाणी अन्य सोयीसुविधा पुरविण्याचे आणि क्रीडा संकुल नसलेल्या तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. क्रीडा आढावा बैठकीत अहेरी उपविभागातील संवर्ग विकास अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
270821\img-20210827-wa0095.jpg
अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांची क्रीडा विषयी आढावा बैठक