बीजस्नानासाठी गेलेल्या इसमाला जलसमाधी; गडचिरोलीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:49 PM2018-02-16T16:49:19+5:302018-02-16T16:49:31+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील शिवमंदिरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात शुक्रवारी बीज स्रानासाठी गेलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील शिवमंदिरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात शुक्रवारी बीज स्रानासाठी गेलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश माधव खेवले (३५) रा.विसापूर, जि.गडचिरोली असे मृतक इसमाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नदीपात्रात अर्धवट स्थितीत असलेल्या पुलाजवळ खेवले यांचा मृतदेह सापडला.
बीजनिमित्त परिवारातील मृतांच्या नावे येथे स्रान करून पिंडदान करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेकडो लोकांनी शुक्रवारी येथे गर्दी केली होती. याचदरम्यान ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चामोर्शी ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील कार्यवाही सुरू आहे.