तीर्थस्थळ मार्कंडाचा प्रवास झाला खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:23+5:302021-03-04T05:09:23+5:30
चामाेर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थस्थळ मार्कंडाकडे जाण्याचा प्रवास रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रचंड खडतर बनला आहे. चामाेर्शी-मार्कंडा रस्त्यावर ...
चामाेर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थस्थळ मार्कंडाकडे जाण्याचा प्रवास रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रचंड खडतर बनला आहे. चामाेर्शी-मार्कंडा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या डांबरी मार्गाची पूर्णत: वाट लागली आहे. या मार्गावर माेठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
मार्कंडादेव येथे विदर्भ व राज्याच्या विविध भागातून हजाराे भाविक येतात. काेराेनामुळे यावर्षी जत्रा भरणार नाही. महाशिवरात्रीनिमित्त येथे भाविक दर्शनासाठी येण्यास इच्छुक असतात. मात्र, रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक भाविकांना मार्कंडा तीर्थस्थळी पाेहाेचणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी दखल घेऊन या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चामाेर्शी-मार्कंडा, चामाेर्शी व्हाया शंकरपूर हेटी तसेच फराडा व मार्कंडा या मार्गाने मार्कंडा तीर्थस्थळी नागरिक व भाविक दरराेज येत असतात. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चिचडाेह बॅरेजच्या कामासाठी जड वाहने मार्कंडा मार्गावरून आवागमन करीत हाेते. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून गिट्टी उखडली आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, केंद्रीय सहाय्य याेजनेंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली आहे.