मरमात खांब लागले; मात्र वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:09 AM2017-10-16T00:09:41+5:302017-10-16T00:09:54+5:30

तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत.

The pillars of silk began; But there is no electricity | मरमात खांब लागले; मात्र वीज नाही

मरमात खांब लागले; मात्र वीज नाही

Next
ठळक मुद्देविजेची नागरिकांना प्रतीक्षा : वादळाने कोलमडलेले खांब अजूनही जमिनीवरच

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गावकºयांना अजूनही अंधारातच रात्र काढावी लागत आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मरमा या गावात २०११ मध्ये वीज पुरवठा करण्यात आला होता. जेमतेम चार ते पाच दिवस वीज पुरवठा सुरू होता. त्यानंतर वादळी पाऊस झाल्याने विद्युत खांब जमिनीवर कोसळले व वीज पुरवठा खंडित झाला. या गावाला खांबतळा या गावावरून वीज पुरवठा केला होता. खामतळा या गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे. खांबतळा ते मरमा गावादरम्यानचे अंतर चार किमी एवढे आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने या ठिकाणी खांब आणून ठेवले आहेत. मात्र ते उभे कधी केले जातील, असा प्रश्न गावातील नागरिक विचारत आहेत. खांबतळा गावाला मालेवाडा येथून वीज पुरवठा होतो. मालेवाडा येथील वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील नागरिक सुरेश पदा, सुरेश उसेंडी, मानू उईके, राजू हलामी, दलसाय दुर्रो, श्रावण तुलावी, श्यामराव दुर्रो, अलीराम पदा, प्रेमिला दुर्वे, यशवंता उईके, जयवंता उईके, नीरज उसेंडी यांनी केला आहे.
या गावात एकूण २२ घरे असून गावाची लोकसंख्या १४६ एवढी आहे. या गावात एक हातपंप आहे. सदर हातपंप नादुरूस्त झाल्यास नागरिकांना शेतातील विहिरीचे पाणी प्यावे लागते. गावात अंगणवाडी नाही. गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते.

Web Title: The pillars of silk began; But there is no electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.