मूल मार्गावरील पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:44 PM2017-12-05T22:44:42+5:302017-12-05T22:44:59+5:30

मूल मार्गावरील महिला महाविद्यालयासमोर कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे.

Pipeline on the original route | मूल मार्गावरील पाईपलाईन फुटली

मूल मार्गावरील पाईपलाईन फुटली

Next
ठळक मुद्देतीन दिवसांपासून कॉम्प्लेक्सचा पाणीपुरवठा बंद : नगर परिषदेमार्फत दुरूस्तीचे काम सुरू

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : मूल मार्गावरील महिला महाविद्यालयासमोर कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे. सदर पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्याने मागील तीन दिवसांपासून कॉम्प्लेक्स परिसराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.
पाणी शुद्धीकरण केंद्रावरून कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मुख्य रस्त्याच्या बाजूला टाकली आहे. या पाईपलाईनमधून एलआयसी कार्यालयाजवळील पाण्याची टाकी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारातील पाणी टाकी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाणी टाकीत पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन वर्षांपासून महिला महाविद्यालयासमोर पाईपलाईन लिकेज झाली होती. सदर पाईपलाईन दुरूस्ती करण्याचे काम तीन दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. दुरूस्तीसाठी खोदकाम केले असता, पाईपाजवळची माती निघून गेल्याने आणखी लिकेज वाढून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. एकूण पाणीपुरवठ्याच्या जवळपास ८० टक्के पाणी बाहेर जात असल्याने मागील तीन दिवसांपासून पाण्याच्या टाक्या भरण्यास अडचण येत आहे. परिणामी तीन दिवसांपासून कॉम्प्लेक्स परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाणीपुरवठा बंद झाला आहे.
खोदकामानंतर पाईपलाईन दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सदर पाईपलाईन जुनी आहे. त्यामुळे या पाईपलाईनचे सामान मिळण्यास अडचण जात आहे. गडचिरोली व चंद्रपूर येथे सुद्धा दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले टेलपीस हे साहित्य मिळाले नाही.
नागपूर येथून साहित्य आणले जाणार आहे. त्यामुळे किमान पुन्हा दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर येथून आणावे लागणार साहित्य
गडचिरोली येथील पाणीपुरवठा पाईपलाईन जुनी आहे. लिकेजच्या ठिकाणी टेलपीस लावणे आवश्यक आहे. सदर साहित्य आणण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाºयाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे साहित्य मिळाले नाही. त्यामुळे नागपूर येथील दुकानातून साहित्य बोलविले जाणार आहे. बुधवारी सदर साहित्य उपलब्ध झाल्यानंतर सायंकाळपर्यंत लिकेज दुरूस्ती केली जाईल. त्यानंतर गुरूवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचण जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. पाईपलाईन दुरूस्तीसाठी आपण स्वत: प्रयत्नशील असल्याची माहिती नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

Web Title: Pipeline on the original route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.