साेनाेग्राफीसाठी सिराेंचावासीयांची पायपीट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:58+5:302020-12-25T04:28:58+5:30

सिराेंचा हा गडचिराेली जिल्ह्याचा शेवटचा तालुका आहे. ५० किमी विस्ताराच्या या तालुक्यात सिराेंचा येथे एकच ग्रामीण रूग्णालय आहे. त्यामुळे ...

The pipeline of the people of Sirencha stopped for cinematography | साेनाेग्राफीसाठी सिराेंचावासीयांची पायपीट थांबली

साेनाेग्राफीसाठी सिराेंचावासीयांची पायपीट थांबली

Next

सिराेंचा हा गडचिराेली जिल्ह्याचा शेवटचा तालुका आहे. ५० किमी विस्ताराच्या या तालुक्यात सिराेंचा येथे एकच ग्रामीण रूग्णालय आहे. त्यामुळे तालुकाभरातील रूग्ण याच दवाखाण्यात दाखल हाेतात. खासगी रूग्णालय सुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे संपूर्ण भार शासकीय आराेग्य यंत्रणेवर अवलंबून आहे. गराेदर मातेची आराेग्य तपासणी करताना साेनाेग्राफी ही अत्यंत महत्वाची तपासणी आहे. मात्र सिराेंचा तालुक्यात एकाही ठिकाणी साेनाेग्राफीची सुविधा नसल्याने महिलांना अहेरी उपजिल्हा रूग्णालय किंवा तेलंगणा राज्यातील खासगी दवाखाण्यांमध्ये जावे लागत हाेते. परिणामी अनेक महिला साेनाेग्राफी काढत नव्हत्या. सरकारच्या जननी सुरक्षा याेजना व जननी शिशु सुरक्षा याेजना या दाेन याेजनांतर्गत गर्भवती महिलांना खासगी रूग्णालयांमध्ये साेनाेग्राफी करण्यासाठी ७०० रुपये अनुदान दिले जात हाेते.

सातत्याने मागणी केल्यानंतर सिराेंचा येथे साेनाेग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांची तसेच इतर रूग्णांची साेनाेग्राफीसाठी हाेणारी पायपीट वाचण्यास मदत हाेणार आहे.

काेट

दर मंगळवारी ग्रामीण रूग्णालयात साेनाेग्राफी काढून दिली जाईल. डाॅ. शशिकांत बदेेला यांच्याकडे ही जबाबदारी साेपविण्यात आली आहे. तालुक्यातील गर्भवती महिलांनी आशावर्कर यांच्याशी संपर्क साधून साेनाेग्राफी करून घ्यावी. ग्रामीण रूग्णालयात साेनाेग्राफीची सुविधा पूर्णपणे माेफत आहे.

- डाॅ. अश्विन वलके, ग्रामीण रूग्णालय सिराेंचा

फाेटाे - महिलेची साेनाेग्राफी करताना ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर.

Web Title: The pipeline of the people of Sirencha stopped for cinematography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.