श्रमदानातून बुजविले घोट-चामोशी मार्गावरील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:18+5:302020-12-29T04:34:18+5:30
घोट : घोट-चामोशी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. मागील दाेन वर्षांपासून या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. ...
घोट : घोट-चामोशी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. मागील दाेन वर्षांपासून या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. रस्त्यावरुन आवागमन करताना नागरिकांन त्रास हाेत असल्याची समस्या जाणून घाेट येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुजविले.
घाेट-चामाेर्शी मार्गाने मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने तसेच एसटी महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या या मार्गाने आहेत. परंतु या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. तर काहींना गंभीर दुखापत झाली. अनेकांचे हात-पाय मोडण्याचे प्रकार सुद्धा झाले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर रविवारी सामाजिक कार्यकर्ते व घोट पत्रकार संघाच्या वतीने गिट्टी व मुरूम टाकून अपघातप्रवण स्थळावरील खड्डे बुजविण्यात आले. घोटकडून चामोशीकडे जात असताना गोलाबाई मंदिरापासून काही अंतरावरील मोठे खडे बुजविण्यात आले.
या उपक्रमात घोट येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वडेट्टीवार, गौर शाहा व पत्रकार संघाचे पांडुरंग कांबळे, तरुण शाहा, हेमंत उपाध्ये, मिथून निकुरे, नवसागर कावळे, सुभाष गुरुनुले, विकास करपते, उमेश कावळे, विश्वनाथ कावळे, पत्रू गुरनुले, रामदास मडावी आदी सहभागी झाले.