विद्यार्थ्यांचे आधार अपडेट्स करण्याबाबत नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:53+5:302021-07-04T04:24:53+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक हाेत्या. मार्गदर्शक म्हणून गटसमन्वयक विजय बन्सोड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून १०० टक्के ...
सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक हाेत्या. मार्गदर्शक म्हणून गटसमन्वयक विजय बन्सोड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून १०० टक्के आधार अपडेट्स असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्धन बुध्दे, नगर परिषदेचे केंद्रप्रमुख अंबादास आमनर उपस्थित हाेते.
शंभर टक्के आधार अपडेट्स करण्यासाठी शाळांवर सेतू केंद्र उपलब्ध करून देऊन ते कसे पूर्ण करता येईल? याबाबतचे नियोजन सांगून गटशिक्षणाधिकारी निर्मला कुचिक यांनी मार्गदर्शन केले. तर ऑनलाइन अभ्यास उपक्रमांतर्गत ४५ दिवसांचा सेतू अभ्यास अभ्यासमाला, शिकू आनंदे आदी उपक्रमांवर गटसमन्वयक विजय बन्सोड यांनी मार्गदर्शन केले.
सभेला विविध शाळांच्या मुख्याध्यापकासह बीआरसीच्या रानू ठाकूर, वैशाली खोब्रागडे, आधार केंद्राचे रेकचंद कांबळे, आयशा शेखाणी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक, संचालन व आभार न.प. शाळा केंद्रप्रमुख अंबादास आमनर यांनी मानले.