सीआरपीएफ ११३ बटालियनतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:46+5:302021-06-09T04:45:46+5:30
सीआरपीएफ बटालियनतर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते या वर्षी पर्यावरण दिवसाचे थीम इकोसिस्टम रिस्टोरेशन ठेवण्यात आले, याचा अर्थ नागरिकांद्वारे पर्यावरणाला ...
सीआरपीएफ बटालियनतर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते या वर्षी पर्यावरण दिवसाचे थीम इकोसिस्टम रिस्टोरेशन ठेवण्यात आले, याचा अर्थ नागरिकांद्वारे पर्यावरणाला झालेल्या नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्न करणे हा होय. या वेळी विविध प्रकारची फळे व ऑक्सिजन देणारी झाडे लावून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. कोरोना महामारीने मानवाला पर्यावरणाचे महत्त्व समजावले. या वर्षी धानोरा परिसरात सीआरपीएफतर्फे विविध प्रकारची तीन हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या वेळी ११३ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, उपकमांडंट ए.के. अनस, प्रमोद शिरसाठ, सुभेदार मेजर बालबीर सिंह, उपनिरीक्षक पृथ्वी सिंह, तसेच सीआरपीएफ जवान उपस्थित होते.