टाॅवर परिसर स्वच्छ करून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:40 AM2021-08-24T04:40:35+5:302021-08-24T04:40:35+5:30

आरमोरी : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील बी.एस.एन.एल टॉवर परिसरात रविवारी युवारंगतर्फे स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण ...

Plantation done by cleaning the tower premises | टाॅवर परिसर स्वच्छ करून केले वृक्षारोपण

टाॅवर परिसर स्वच्छ करून केले वृक्षारोपण

Next

आरमोरी : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील बी.एस.एन.एल टॉवर परिसरात रविवारी युवारंगतर्फे स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले. टॉवरच्या परिसरातील सार्वजनिक विहिरीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपी वाढली हाेती. तसेच काडीकचरा जमा झाला हाेता. या परिसरात वाॅर्डातील लहान मुले नेहमी खेळतात. पावसाळ्यात या परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन मागील दोन वर्षांपासून युवारंगतर्फे या परिसराची स्वच्छता केली जात आहे. युवारंग क्लबच्या वतीने झुडपी कचरा साफ करून याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, विभागीय संघटक नेपचंद पेलणे, जिल्हा संघटक राकेश सोनकुसरे, युवारंगचे सदस्य, सूरज पडोळे, मोहित खेडकर, शरद भानारकर, बादल बांबोळे, कृष्णा खेडकर, आकाश खेडकर, रोहित बावनकर व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.

230821\img_20210823_140450.jpg

झाडाझुडपाची स्वच्छता करताना युवारंग चे कार्यकर्ते

Web Title: Plantation done by cleaning the tower premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.