१७ हजार हेक्टरवर रोवणी आटोपली
By admin | Published: August 8, 2015 01:37 AM2015-08-08T01:37:24+5:302015-08-08T01:37:24+5:30
जून महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात ६२७.७ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी ...
गडचिरोली : जून महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात ६२७.७ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील २९ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ५०५ हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण केली आहे.
यावर्षीच्या हंगामात १ लाख १९ हजार ७३४ हेक्टरवर धान पिकाची रोवणी व २९ हजार ५४९ हेक्टरवर आवत्या पध्दतीने धानाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाच्या मार्फतीने व्यक्त करण्यात आला होता. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात २९ जुलैपर्यंत सुमारे १६ हजार ५०५ हेक्टरवर रोवणीचे कामे पूर्ण झाली असल्याचे दिसून आले आहे. अजुनही १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविनाच आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस पडला. कोरची, भामरागड, एटापल्ली या तालुक्यामध्ये पावसाने थोडीफार चांगली हजेरी लावली. त्यामुळे धानपिकाच्या रोवणीला या तालुक्यांमध्ये सुरूवात झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाचे पाणी सोडण्यात आले. या तालुक्यात मागील १० दिवसांपासून रोवणीच्या कामाला गती आली. मात्र इतर तालुक्यांमधील शेतकरी अजुनही पावसाची प्रतीक्षाच करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)