एसआरपीएफतर्फे विसाेराजवळ वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:58+5:302021-06-30T04:23:58+5:30

यावेळी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १३ चे सहायक समादेशक डी. एस. जांभुळकर, मुख्यालय पोलीस निरीक्षक ए. एन. ...

Planting of trees near Visa by SRPF | एसआरपीएफतर्फे विसाेराजवळ वृक्षाराेपण

एसआरपीएफतर्फे विसाेराजवळ वृक्षाराेपण

Next

यावेळी राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १३ चे सहायक समादेशक डी. एस. जांभुळकर, मुख्यालय पोलीस निरीक्षक ए. एन. रूपनारायण, पोलीस कल्याण अधिकारी पवन मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक मडावी, वाय. बी. रामटेके तसेच कर्मचारी उपस्थित हाेते. पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व असून वृक्षांच्या माध्यमातूनच मानवाची ऑक्सिजनची प्राथमिक गरज भागवली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संरक्षण व संवर्धन करावे, असे आवाहन समादेशक डाॅ. पवन बन्सोड यांनी मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गावरान प्रजातींचे आंबे, सीताफळ, फणस, पेरू तसेच इतर विविध प्रकारची फळे झाडे लावण्यात आली. दरम्यान, उपस्थित जवानांना लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची शपथ देण्यात आली.

Web Title: Planting of trees near Visa by SRPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.