काेराेना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:20+5:302021-04-27T04:37:20+5:30
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रुग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील ...
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रुग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अँटीबॉडी दुसऱ्या रुग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात शक्य आहे. मात्र, प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातून बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याव्दारे उपचार करणे कठीण हाेत आहे. एक प्लाझ्मा दानातून दोन रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत काही लाेकांनी समोर येऊन प्लाझ्मा दान केले आहे.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपी या उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागानेही तयारी सुरू केली आहे. कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवस ते चार महिन्यांच्या कालावधीत प्लाझ्मा दान करून इतर दोन व्यक्तिंचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्लाझ्मा डोनरने प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी केले आहे.