गडचिरोली व देसाईगंजात प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:04 PM2018-10-11T23:04:55+5:302018-10-11T23:05:08+5:30

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.

The plastic seized in Gadchiroli and Desaiganj | गडचिरोली व देसाईगंजात प्लास्टिक जप्त

गडचिरोली व देसाईगंजात प्लास्टिक जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून दंड वसूल : कारवाईसाठी विशेष पथकाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/देसाईगंज : गडचिरोली व देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.
गडचिरोली नगर परिषदेने प्लास्टिक जप्तीची कारवाई सुरू केली. नगर परिषदेच्या पथकाने शहरातील दुकानांची चौकशी केली. ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आली, तेथील दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास पाच हजार रूपयांची प्लास्टिक जप्त केली. त्याचबरोबर काही विक्रेत्यांवर कारवाई सुध्दा केली. सदर कारवाई नगर परिषदेचे कर्मचारी भरडकर, योगेश सोनवाने यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात नगर परिषद कर्मचाºयांचा समावेश असलेले भरारी पथक तयार करण्यात आले आहे. भरारी पथकातील कर्मचारी दुकानांची चौकशी करीत असून दुकानात विक्रीसाठी असलेल्या प्लास्टिक आढळून आल्यास ते जप्त केले जात आहेत. त्याचबरोबर प्लास्टिकची विक्री करूनही असे आवाहनही केले जात आहे. लहान दुकानदारांनी प्रतिबंधीत प्लास्टिकमध्ये वस्तू बांधून देऊ नये, असे आवाहन केले जात आहे. नगर परिषदेने सुमारे १० हजार रूपये किमतीची प्लास्टिक जप्त केली. सदर कारवाई नगर परिषदेचे अभियंता बोंदरे, लवकुश उरकुडे, उदय सोनेकर, प्रेमचंद चव्हारे, किशोर पुरकाम, राजू निंबेकर, जुमनाके यांनी केली.
कारवाई सुरू केल्यानंतर व्यापारी काही दिवस प्लास्टिकच्या वस्तू विक्री करीत नाही. मात्र त्यानंतर पुन्हा विक्री सुरू ठेवतात. दुकानदारांनी सामाजिक जबाबदारी व कायद्याचे भान ठेवून प्लास्टिकची विक्री बंद करणे आवश्यक आहे.

Web Title: The plastic seized in Gadchiroli and Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.