मान्सुनचे आगमन सुखावणारे; अहेरी व भामरागडात दमदार, इतरत्र रिपरिप

By दिगांबर जवादे | Published: June 26, 2023 09:05 PM2023-06-26T21:05:05+5:302023-06-26T21:05:56+5:30

पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसावरून जिल्ह्यातही दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती

Pleasant arrival of monsoon; Strong in Aheri and Bhamragarh, riprip elsewhere | मान्सुनचे आगमन सुखावणारे; अहेरी व भामरागडात दमदार, इतरत्र रिपरिप

मान्सुनचे आगमन सुखावणारे; अहेरी व भामरागडात दमदार, इतरत्र रिपरिप

googlenewsNext

दिगांबर जवादे

गडचिरोली : अहेरी व भामरागड या दोन तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. इतर तालुक्यांमध्ये मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. विशेष म्हणजे, अजूनही काही तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. २१ जून रोजी गडचिरोली तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात मान्सून कोसळला. चार दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसावरून जिल्ह्यातही दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही दमदार पाउस झाला नाही. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात भीती बाळगतच पेरणीची कामे आटोपत आहेत. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, मोठा पाऊस आला नाही. दुसरीकडे अहेरी व भामरागड तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अहेरी तालुक्यात ४८.८ मिमी, तर भामरागड तालुक्यात ३३.१ मिमी पाऊस पडला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण २० मिमी पेक्षा कमीच आहे.

कुरखेडा व देसाईगंजला पावसाची हुलकावणी

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र देसाईगंज व कुरखेडा या तालुक्यांना पावसाने हुलकावणी दिली आहे. देसाईगंज तालुक्यात २६ जूनपर्यंत केवळ ४.३ मिमी पाऊस पडला आहे. तर कुरखेडा तालुक्यात एकही पाऊस पडला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशाच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

२८ जूननंतर विश्रांती ?

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ जून रोजी मंगळवारी जिल्ह्याच्या अगदी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस होईल. २८ जूननंतर मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तविली आहे. हाच अंदाज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठीही वर्तविला आहे.
 

Web Title: Pleasant arrival of monsoon; Strong in Aheri and Bhamragarh, riprip elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.