कामावर मजुरांनी घेतली मतदानाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:18 AM2019-03-25T00:18:54+5:302019-03-25T00:19:23+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्वाचन विभागातर्फे निवडणुकीत मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जांभळी येथे मतदानाची शपथ मजुरांनी रविवारी घेतली.

Pledge of voting took place by workers at work | कामावर मजुरांनी घेतली मतदानाची शपथ

कामावर मजुरांनी घेतली मतदानाची शपथ

Next
ठळक मुद्देजांभळी येथे बोडीचे काम : रोजगार हमी योजनेच्या कामावरील १८० मजुरांचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्वाचन विभागातर्फे निवडणुकीत मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जांभळी येथे मतदानाची शपथ मजुरांनी रविवारी घेतली. बोडीच्या कामावरील सर्व मजूर गोळा होऊन आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प १८० मजुरांनी घेतला.
धानोरा तालुक्यातील जांभळी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. या कामांतर्गत ठमाबाई तुमरेटी यांच्या शेतातील बोडीचे काम सुरू असून या मजुरांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याकरिता ग्रामविकास अधिकारी किशोर कुलसंगे व नरेगाचे शाखा अभियंता भेडके, रोजगार सेवक भुपेंद्र राजगडे यांनी रोहयो कामाचे स्थळ गाठून मजुरांना एकत्र केले. सर्व मजुरांनी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र झाले. त्यानंतर सर्व मजुरांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. सर्व मजुरांना प्रोत्साहित केल्यानंतर त्यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार, असा संकल्प केला.
यावेळी गावातील एकूण १८० मजूर उपस्थित होते. धानोरा तालुक्यात शाळा-महाविद्यालयांच्या वतीने गावांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे. अनेक ठिकाणी रॅली काढून मतदारांना मतदानाबाबत प्रोत्साहित करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Pledge of voting took place by workers at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.