चव्हेला मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:52 PM2017-11-28T22:52:49+5:302017-11-28T22:53:11+5:30
तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही.
आॅनलाईन लोकमत
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे.
शासनाच्या महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चव्हेला- रानवाही या मार्गाचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान सदर मार्गावर मातीकाम करण्यात आले. या मार्गावरील नाल्यावर पाईप टाकून रपटा तयार करण्यात आला. मात्र यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने पाईपावरील माती पुर्णत: वाहून गेली. आता पाईप खुल्या स्वरूपात दिसत असून हे पाईप अस्थाव्यस्त झाल्याने सदर मार्गाने जाणे वाहनधारकांना शक्य होत नाही. चव्हेला- रानवाही या मार्गावर अनेक गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिक याच मार्गाने आवागन करतात. मात्र चव्हेला-रानवाही या मार्ग वाहतुकीस योग्य नसल्याने येथे प्रवाशी वाहने जात नाही. सदर मार्गाची प्रशासनाने पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.