वाकडी मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:39 AM2017-09-30T00:39:49+5:302017-09-30T00:40:00+5:30
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
लखमापूर बोरी ते वाकडीपर्यंत तीन किमीचे अंतर आहे. दोन गावांमध्ये घनदाट जंगल असून मधोमध मोठा नाला आहे. लखमापूर बोरी हे मोठे गाव असल्याने वाकडी येथील नागरिकांना विविध कामांसाठी लखमापूर बोरी येथे नियमित यावे लागते. १० ते १५ वर्षांपूर्वी रोहयोच्या माध्यमातून या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर २०१५ मध्ये लखमापूर बोरीपासून नाल्यापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर डांबरीकरण अर्धवट झाले. सध्या दोन किमी रस्ता डांबरीकरणाशिवाय असल्याने या मार्गावरील गिट्टी पूर्णत: उखडलेली आहे. विशेष म्हणजे पुलाजवळ मोठा खड्डा पडून वाहतुकीस अडथळा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
नाल्यावर पुलाची प्रतीक्षा
लखमापूर बोरी येथील शेतकºयांच्या जमिनी नाल्याच्या पलिकडे आहेत. शेतात उत्पादित झालेला माल घरापर्यंत नाल्यातून आणण्याकरिता कसरत करावी लागते. अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी येथे पूल बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.