वघाळा-सायगाव-शिवणी रस्त्याची दुर्दशा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:26+5:302021-04-12T04:34:26+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अंतर्गत येत असलेले वघाळा, सायगाव, शिवनी रोडमागील दोन वर्षांपासून खडीकरण करून पडलेले आहे. तिन्ही गावच्या ...
सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अंतर्गत येत असलेले वघाळा, सायगाव, शिवनी रोडमागील दोन वर्षांपासून खडीकरण करून पडलेले आहे. तिन्ही गावच्या लोकांना होणारा प्रवास हा भयंकर आणि मनस्ताप देणारा आहे. रोडच्या कच्च्या स्वरूपातील अर्धवट काम आणि वरती असणारी अस्ताव्यस्त दगडी गिट्टी यामुळे प्रवासासाठी साधी सायकलसुद्धा चालू शकत नाही. या रोड संबंधाने सार्वजनिक बांधकाम विभाग मधील इंजिनियर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी एक महिना अगोदर रोड संबंधातील काही शासकीय पत्रव्यवहाराच्या त्रुटी दूर करून १५ दिवसात काम सुरू करू, असे आश्वासन दिले. रोड कंत्राटदार एस. के. मेहता यांनीसुद्धा १५पंधरा दिवसात ज्या काही त्रुटी आहेत तर दुरुस्त करून काम सुरू करणार असे आश्वासन दोघांनी दिले; पण एक महिन्याचा कालावधी उलटूनसुद्धा रोडच्या कामाला सुरुवात झालेली नाही. वरील संबंधित विभाग व कंत्राटदार यांना आता कुठलीही समज व चर्चा न करता येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने लाॅकडाऊनच्या कालावधीत संपल्यानंतर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद अनोले यांनी दिला आहे.