अतिक्रमित जागेचे प्लाॅट पाडून विक्रीचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:29+5:302021-09-15T04:42:29+5:30
कुरुड ग्रामपंचायतीअंतर्गत स्मशानभूमीलगत सन २००४-०५ पर्यंत सर्व्हे नंबर ६६९ या जागेवर चिंतामण सदाशिव खानोरकर यांचे अतिक्रमण होते. मात्र, खानोरकर ...
कुरुड ग्रामपंचायतीअंतर्गत स्मशानभूमीलगत सन २००४-०५ पर्यंत सर्व्हे नंबर ६६९ या जागेवर चिंतामण सदाशिव खानोरकर यांचे अतिक्रमण होते. मात्र, खानोरकर गाव सोडून कुटुंबासमवेत नागपूरला राहायला गेल्यानंतर ही जागा तशीच पडून होती.
ही बाब देसाईगंज येथील बेकायदेशीर प्लॅट खरेदी - विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या निदर्शनास येताच एका व्यावसायिकाने या जागेवर तब्बल ३४ प्लॅट पाडून प्रत्येकी प्लॅट १ लाख ५० हजार ते २ लाखापर्यंत किमतीला विक्री सुरू केली आहे. आतापर्यंत या माध्यमातून अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष बाब अशी, की ही जागा महसूल विभागाची आहे. खरेदी - विक्रीच्या नोंदीचा प्रश्न उपस्थित हाेत नाही. या प्रकरणाचे बिंग फुटले असून, एकच प्लॉट अनेकांना विक्री केल्याचेही सांगण्यात येत आहे. या खरेदी - विक्रीच्या गोरखधंद्यास येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांचीच तर मूक संमती नाही ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जाऊ लागला आहे. या जागेसंदर्भात महसूल विभागाने अधिक सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
140921\img-20210911-wa0050.jpg
हीच ती कुरुड येथील महसुल विभागाची अतिक्रमण करुन पाडण्यात आलेली प्लॕटींगची जागा.