न्यूमाेकाेकल लस राेखणार न्यूमाेनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:08+5:302021-07-09T04:24:08+5:30
बाॅक्स .... काेणाला मिळणार लस? -सहा आठवड्याच्या बाळाला इतर निर्धारित लसबराेबरच पीसीव्ही लसचा पहिला डाेस दिला जाईल. - ज्या ...
बाॅक्स ....
काेणाला मिळणार लस?
-सहा आठवड्याच्या बाळाला इतर निर्धारित लसबराेबरच पीसीव्ही लसचा पहिला डाेस दिला जाईल.
- ज्या बाळाला पीसीव्हीचा पहिला डाेज मिळाला आहे त्याला वयाच्या १४ आठवड्यामध्ये पीसीव्हीचा दुसरा डाेज दिला जाईल व नवव्या महिन्यात तिसरा बुस्टर डाेस दिला जाईल.
- मुदतपूर्व जन्म झालेले बाळ, कुपाेषित बाळ, राेग प्रतिकारक शक्ती कमी असलेले बाळ यांनाही लस दिली जाईल. ज्या बाळाला लसीतील घटकांची ॲलर्जी असेल त्याला डाेज देता येणार नाही.
बाॅक्स ......
न्यूमाेकाेकल कसा पसरताे
न्यूमाेकाेकल हा आजार स्ट्रेप्टाेकाेकस न्यूमाेनिया या जिवाणूमुळे हाेते. हा आजार संसर्गजन्य आहे. खाेकला किंवा शिंकण्याच्या माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा आजार पसरते.
बाॅक्स ...
न्यूमाेकाेकल आजाराची लक्षणे
ताप येणे, कान दुखणे, वाहने, सायनसच्या भागात दुखणे, नाकातून सतत पाणी वाहने, थंडी वाजून ताप येणे, श्वसनाची गती कमी हाेणे आदी लक्षणे आढळून येतात.
बाॅक्स .
न्यूमाेकाेकल आजाराचा सर्वाधिक धाेका काेणाला आहे
पाच वर्षांच्या आतील मुले विशेष करून दाेन वर्षांच्या आतील मुले. वयस्क व राेगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना या आजाराचा सर्वाधिक धाेका आहे.