पोकलेन व टिप्पर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:13 IST2018-10-29T22:12:49+5:302018-10-29T22:13:09+5:30

आसरअल्ली परिसरातून मुरूमाचे अवैध खनन करणारे पोकलेन मशीन व टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

Pokleen and Tips seized | पोकलेन व टिप्पर जप्त

पोकलेन व टिप्पर जप्त

ठळक मुद्देकोट्यवधींच्या मुरूमाची चोरी : आसरअल्ली येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : आसरअल्ली परिसरातून मुरूमाचे अवैध खनन करणारे पोकलेन मशीन व टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
आसरअल्ली ते पातागुडम व इंद्रावती नदीवरील पुलाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने दिलेल्या मुदतीत ते पूर्ण झाले नाही. मार्च २०१८ मध्येच कामाची मुदत संपली. मात्र ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. या कामांसाठी आसरअल्ली परिसरातून मुरूमाचे अवैध खनन केले जात होते. याबाबतची तक्रार आसरअल्ली येथील श्रीकांत सुगरवार यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केली होती. मात्र वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत होते. याचा फायदा कंत्राटदार घेत होता. या खाणीतून कोट्यवधी रूपयांचे मुरूम चोरण्यात आले. मुरूमासाठी परिसरातील झाडे तोडण्यात आली. त्याचबरोबर सततच्या खोदकामामुळे नाल्याचा विस्तार वाढला. पातागुडम व कोरलाचे तलाठी रवी मेश्राम यांनी जीव धोक्यात घालून अवैध खननाचा व्हिडीओ तयार केला. सदर व्हिडीओ वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार घटनास्थळावरून पोकलेन मशीन व टिप्पर जप्त करण्यात आले आहे. मागील काही महिन्यात कंत्राटदाराने कोट्यवधी रूपयांचा मुरूम चोरून नेला आहे. याची चौकशी करून कंत्राटदाराकडून तेवढी रक्कम वसूल करावी, त्याचबरोबर त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आहे.

Web Title: Pokleen and Tips seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.