पोलिसांनी ५० जनावरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:17 AM2017-10-13T00:17:06+5:302017-10-13T00:17:30+5:30

तेलंगणातील कत्तलखान्यात घेऊन जाणारी ५० जनावरे मुलचेरा पोलिसांनी बुधवारी पकडून कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका केली.

Police caught 50 cattle | पोलिसांनी ५० जनावरे पकडली

पोलिसांनी ५० जनावरे पकडली

googlenewsNext
ठळक मुद्देसात आरोपींना अटक, १२ फरार : कत्तलीसाठी नेणाºया जनावरांची मुक्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तेलंगणातील कत्तलखान्यात घेऊन जाणारी ५० जनावरे मुलचेरा पोलिसांनी बुधवारी पकडून कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून १२ आरोपी फरार आहेत.
विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान आरोपींकडून हल्ला करण्यात आल्याने एक पोलीस शिपाई जखमी झाला. छत्तीसगड राज्यातून मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली-श्रीनगर-कोठारी मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी ५० जनावरे नेत असल्याची गुप्त माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर ५० जनावरे बुधवारी पकडली.
समर ऊर्फ टिल्लू मुखर्जी (२९), किरण कलाचंद दास (२८) रा. विवेकानंदपूर, मनमत विष्णूपद रॉय (३६) रा. श्रीनगर, अविनाश खितीश दास (४९) रा. श्रीनगर, उत्तम गणेश बिश्वास (२३), रणो नित्योनंद हिरा (२३) रा. पाखांजूर नं. २३, संजय मनीमोहन मंडल (३०) रा. पाखांजूर नं. २१ या सात आरोपींना अटक करून गुरूवारी चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना १६ आॅक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१० आॅक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मिलींद पाठक यांच्या नेतृत्वात गोकुलदास मेश्राम, अरविंद हलदार, भाऊराव वनकर, रवींद्र आखाडे, सुखदेव लोणारकर, सखाराम सेडमाके, दादाजी रामटेके, सुभाष सहारे आदींनी सापळा रचून ४६ गाय व बैल तसेच चार म्हैस अशी एकूण ५० जनावरे पकडली. कसायाच्या तावडीतून या जनावरांची सुटका करून सदर जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून लाठ्या व दगडांचा मारा पोलिसांवर केला. त्यामुळे पोलीस हवालदार सुखदेव लोणारकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी आरोपींविरोधात भादंविचे कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४९ तसेच महाराष्टÑ प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्व ५० जनावरांची किंमत ७० हजार रूपये आहे. यापूर्वीही सदर भागातून चोरट्या मार्गाने जनावरांची अवैध वाहतूक झाली होती.
आरोपीत पोलीसही?
विशेष म्हणजे या प्रकरणातील फरार झालेल्या १२ आरोपींमध्ये एका दैनिकाच्या वार्ताहराचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस कर्मचाºयाचाही समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एवढेच नाही तर एका राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्तेही आरोपींमध्ये आहेत.

Web Title: Police caught 50 cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.