गडचिरोली जिल्ह्यात पोलीस हवालदाराची गळा कापून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:53 AM2021-07-05T10:53:30+5:302021-07-05T10:53:57+5:30

Gadchiroli News भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या आणि स्वतःच्या घरी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे आलेल्या पोलीस हवालदाराची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री चाकूने गळा कापून हत्या केली.

Police constable strangled to death in Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात पोलीस हवालदाराची गळा कापून हत्या

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस हवालदाराची गळा कापून हत्या

Next
ठळक मुद्देनागेपल्ली येथे मध्यरात्री झोपेरून उठवून केला हल्ला

 लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली: भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या आणि स्वतःच्या घरी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे आलेल्या पोलीस हवालदाराची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री चाकूने गळा कापून हत्या केली. जगन्नाथ सिडाम (53 वर्षे) असे मृत हवालदाराचे नाव आहे.

ही घटना नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये रविवारच्या रात्री 11.30 ते 12 च्या सुमारास घडली. सिडाम हेे भामरागड़ तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य राहुल सिडाम यांचे ते वडील होत. रविवारी रात्री ते नागेपल्ली येथील आपल्या  घरी झोपून असताना अज्ञात मारेकरुंनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले. त्यानंतर काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकुर,पोलीस निरीक्षक प्रविण डांगे श्वान पथकासह दाखल झाले. पुढील कार्यवाही सुरू आहे.

Web Title: Police constable strangled to death in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.