दोघांना पोलीस कोठडी

By admin | Published: March 24, 2017 01:20 AM2017-03-24T01:20:24+5:302017-03-24T01:20:24+5:30

स्थानिक फुले वॉर्डातील एका किरायाच्या घरात इंदिरानगर बर्डी येथील दारूविक्रेत्यांकडून आरमोरी पोलिसांनी २७ हजार ३०० रूपयांची दारू

Police custody of both | दोघांना पोलीस कोठडी

दोघांना पोलीस कोठडी

Next

फुले वॉर्डात कारवाई : २७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
आरमोरी : स्थानिक फुले वॉर्डातील एका किरायाच्या घरात इंदिरानगर बर्डी येथील दारूविक्रेत्यांकडून आरमोरी पोलिसांनी २७ हजार ३०० रूपयांची दारू जप्त केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर आरोपी राहुल टेंभुर्णे (३१) व रोशन दामले यांना आरमोरी न्यायालयात बुधवारी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राहूल टेंभुर्णे हा अवैैधरित्या देशी व विदेशी दारूविक्री विक्री करीत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली. यात २७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी राहूल टेंभुर्णे, रोशन दामले यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी दोघांनाही आरमोरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरमोरी इंदिरानगर बर्डी येथील दारूविक्रेता कैैलास टेंभुर्णे हा दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, पोलीस शिपाई गोंगले व दोन होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराच्या खोलीत चौकशी केली असता, एका प्लास्टिक गोणीत इम्पेरिअल ब्ल्यू कंपनीच्या ९० निपा आढळून आल्या. त्याची किंमत २२ हजार ५०० रूपये आहे. देशी दारूच्या १२० निपा याची किंमत ४ हजार ८०० रूपये आहे. पोलिसांनी एकूण २७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. बुधवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरमोरी येथे पोलिसांच्या वतीने धाडसत्र राबविणे तीव्र करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Police custody of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.