रेपनपल्लीतही सुरू झाली पोलिसांची ‘दादालोरा खिडकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:43+5:302021-06-02T04:27:43+5:30
यावेळी सीआरपीएफच्या बटालियन ९चे असिस्टंट कमांडन्ट गौतम सरकार, प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे, पो. उपनिरीक्षक पांडुरंग हाके, उपनिरीक्षक विनोद अबूज, ...
यावेळी सीआरपीएफच्या बटालियन ९चे असिस्टंट कमांडन्ट गौतम सरकार, प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे, पो. उपनिरीक्षक पांडुरंग हाके, उपनिरीक्षक विनोद अबूज, पोलीस कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.
सदर खिडकीचे उद्घाटन मर्रीगुडम गावचे पोलीसपाटील नाना आलाम यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित नागरिकांना एसडीपीओ राहुल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन केले.
(बॉक्स)
विविध प्रमाणपत्रांचे वाटप
या पोलीस दादाच्या खिडकीतून अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी मदत केली जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये उपपोलीस स्टेशनच्या हद्दीमधील २० नागरिकांना जात प्रमाणपत्र, ७० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, ६ नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
(बॉक्स)
धोडराजमध्ये बियाणांसाठी नोंदणी
- पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत भामरागड तालुक्यातील धोडराज येथे शेतकऱ्यांची बियाणे अनुदानासाठी मोफत नोंदणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर भात, मुग, उडीद असे बियाणे अनुदानावर मिळण्यासाठी धोडराज हद्दीतील शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.
- बहुतांश भागात नेटवर्क व इंटरनेटची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशनसाठी भामरागड येथे जावे लागत असे. सेवा केंद्रावर रजिस्ट्रेशनसाठी १५० रुपये घेत असत. परंतु दादारोला खिडकीत रजिस्ट्रेशन मोफत करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
- सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सोमय मुंडे, समीर शेख, एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. यासाठी प्रभारी अधिकारी राजेश घाडगे, पो.उपनिरीक्षक गुरव, पाटील, नायक प्रीती खोब्रागडे, शिपाई घोष यांनी सहकार्य केले.
===Photopath===
010621\img_20210601_111417.jpg
===Caption===
"पोलिस स्टेशन रेपणपल्ली येथे पोलीस दादालोरा खिडकी" चे उद्घाटन