पोलीस विभाग नागरिकांच्या पाठिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:05 AM2017-12-27T00:05:29+5:302017-12-27T00:05:43+5:30

Police Department citizens' efforts | पोलीस विभाग नागरिकांच्या पाठिशी

पोलीस विभाग नागरिकांच्या पाठिशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : पोलीस विभाग हा सदैैव जनतेच्या पाठिशी असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैैव तत्पर रांहू, असे प्रतिपादन फौजदार अभिजीत भोसले यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व जिमलगट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी साईनाथ सुरवसे यांच्या उपस्थितीत उपपोलीस स्टेशन जिमलगट्टाच्या वतीने मंगळवारी किष्टापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन किष्टापूरचे सरपंच रोषा सिडाम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच गोविंदराव सडमेक, ग्राम पंचायतीचे सचिव नन्नावरे, पोलीस उपनिरीक्षक साईप्रसाद केंद्रे, ममता गावडे, उपसरपंच भुजंगराव सडमेक, जि. प. शाळेचे शिक्षक तलांडी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गावातील व परिसरातील नागरिकांनी शासनाच्या तसेच विविध विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला जिमलगट्टा येथील पोलीस उपनिरीक्षक साईप्रसाद केंद्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच परिसरातील जवळपास २५० नागरिक उपस्थित होते.
ग्राम पंचायत सचिव नन्नावरे यांनी गावात राबविण्यात येणाºया शासकीय योजनांची माहिती दिली. माता सरस्वती व शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमलगट्टाचे प्रभारी पोलीस अधिकारी साईनाथ सुरवसे यांनी केले तर आभार साईप्रसाद केंद्र्रे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व गावकºयांनी सहकार्य केले.

साहित्याचे वाटप
सदर जनजागरण मेळाव्यात पोलीस विभागातर्फे गरीब व आदिवासी नागरिकांना कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचा लाभ अनेकांनी घेतला.

Web Title: Police Department citizens' efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.