भरतीसाठी पोलीस मुख्यालय मैदान सज्ज
By admin | Published: March 21, 2017 12:47 AM2017-03-21T00:47:38+5:302017-03-21T00:47:38+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६९ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होेती.
२२ पासून शारीरिक चाचणीस प्रारंभ : २७ हजार उमेदवारांनी भरले आॅनलाईन अर्ज
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६९ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होेती. शेवटच्या तारखेपर्यंत सुमारे २७ हजार उमेदवारांनी अर्ज केला असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पोलीस विभागाने २२ मार्चपासूनच उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी पोलीस विभागाने सुरू केली आहे. पोलीस मुख्यालयातील मैदानावर उंची मापण्याचे साहित्य तसेच शारीरिक चाचणीसाठी आवश्यक असलेली इतर साहित्य पोलीस विभागाने लावण्यास सुरूवात केली आहे. पोलीस भरती लक्षात घेऊन कॉम्प्लेक्स परिसरातील भागात वाहतूक व्यवस्थेतही पुढील काही कालावधीतकरिता बदल केले जाणार आहे. यावर्षी उमेदवारांची संख्या अधिक असल्याने भरती प्रक्रिया बराच काळ चालण्याची शक्यता असून संपूर्ण भरती प्रक्रियेवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह विविध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.