शस्त्रक्रियेसाठी पोलिसांतर्फे मदत
By admin | Published: June 26, 2017 01:11 AM2017-06-26T01:11:42+5:302017-06-26T01:11:42+5:30
तालुक्यातील बोरी येथील दीपक पत्रू आदे या २० वर्षीय युवकाला शस्त्रक्रिया करण्यासाठी अहेरी पोलिसांनी
कौतुक : प्राणहिता पोलीस कॅम्पमधील जवानांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील बोरी येथील दीपक पत्रू आदे या २० वर्षीय युवकाला शस्त्रक्रिया करण्यासाठी अहेरी पोलिसांनी सात हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे.
शस्त्रक्रियेसाठी दीपक आदेला लाखो रूपयांचा खर्च येणार आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा मोठा खर्च उचलणे त्याला शक्य नाही. ही बाब प्राणहिता पोलीस कॅम्पमधील पोलीस अधिकाऱ्यांना माहीत झाली. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जवानांनी सुमारे सात हजार रूपयांची आर्थिक मदत गोळा केली व ती मदत दीपकच्या पालकांकडे सुपूर्द केली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, दत्ता दराडे, अमोल फडतरे, अक्षय ठिकने, नेताजी बंडगर, शिवाजी नन्नावरे, पोलीस जवान शेरा पठाण, पराग ओल्लालवार, अनिल गुरनुले, अखिल कोलपाकवार उपस्थित होते. अहेरी पोलिसांनी आजपर्यंत अनेक गरजूंना मदत केली आहे. नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करण्याचेही काम अहेरी पोलीस करीत असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. शस्त्रक्रियेसाठी इतरही नागरिकांनी दीपक आदे याला आर्थिक मदत करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केले आहे.