न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक; विरोधात आदेश दिल्याच्या रागातून कृत्य 

By संजय तिपाले | Published: June 3, 2023 07:41 PM2023-06-03T19:41:30+5:302023-06-03T19:41:38+5:30

विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केली.  

Police inspector arrested for threatening judge Acts out of anger at being ordered against | न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक; विरोधात आदेश दिल्याच्या रागातून कृत्य 

न्यायाधीशांना धमकावणाऱ्या पोलिस निरीक्षकास अटक; विरोधात आदेश दिल्याच्या रागातून कृत्य 

googlenewsNext

गडचिरोली: विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावल्याच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवेला पोलिसांनी अटक केली.  न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलिसांनी मोठी गोपनियता बाळगली. 

चामोर्शी बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत २० एप्रिल रोजी  पहाटे ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा दावा सभापती अतुल गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेवर केला होता.  खांडवेवर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी  २० मे रोजी पो. नि. राजेश खांडवेवर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, २५ मे रोजी सकाळी पो. नि. खांडवे हा न्या. मेश्राम यांच्या निवासस्थानी गेला. माझ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश का दिला, अशी विचारणा केली. त्यावर समजावण्याचा प्रयत्न केला. आपिलात जाण्याची संधी आहे, असे न्या. मेश्राम यांनी समजावले. मात्र, त्यानंतर खांडवेने  हुज्जत घालून धमकावल्याप्रकरणी पो.नि.खांडवेविरुध्द कलम ३२३, ३५३, ४५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

 झाले होते तडकाफडकी निलंबन
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने वेगवान हालचाली केल्या. न्या. मेश्राम यांची गडचिरोली ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा चामोर्शी ठाण्यात वर्ग केला, त्यानंतर  पो. नि. खांडवेला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. गुन्हा उपअधीक्षकदर्जाच्या अधिकाऱ्रूांकडे सोपविला.
 
गडचिरोलीतून घेतले ताब्यात
दरम्यान, पाे.नि. राजेश खांडवेला २ जून रोजी उपअधीक्षक साहील झरकर यांनी गडचिरोलीतून ताब्यात घेतले. दुपारी चामोर्शी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर खांडवेची रवानगी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली. या कारवाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
 

Web Title: Police inspector arrested for threatening judge Acts out of anger at being ordered against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.