वेडमपल्लीच्या जंगलात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक; बंदुकीसह पिस्टल अन् साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:57 AM2023-01-16T09:57:45+5:302023-01-16T09:59:14+5:30

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाचे यश

Police-Naxalite encounter in Vedampally forest; A lot of guns along with pistols and materials were seized | वेडमपल्लीच्या जंगलात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक; बंदुकीसह पिस्टल अन् साहित्य जप्त

वेडमपल्लीच्या जंगलात पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक; बंदुकीसह पिस्टल अन् साहित्य जप्त

googlenewsNext

गडचिरोली : अहेरी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पेरमिली उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेडमपल्ली जंगल परिसरात रविवारी दुपारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र नंतर राबविलेल्या शोधमोहिमेत एक पिस्टल, एक भरमार बंदुक आणि नक्षलींचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दुपारी २ वाजताच्या दरम्यान सदर जंगल परिसरात २० ते २५ च्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. विशेष अभियान पथकाच्या जवानांनी सावध पवित्रा घेत प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. 

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताची नक्षलवाद्यांची योजना होती, पण गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी ती हाणून पाडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता १ भरमार, १ पिस्टल, १ वॉकीटॉकी चार्जर आणि इतर नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या देखरेखीखाली पार पडली.विशेष अभियान पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक करत त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

Web Title: Police-Naxalite encounter in Vedampally forest; A lot of guns along with pistols and materials were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.