दारूमुक्त निवडणुकीसाठी पोलीस पाटील सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:48+5:302021-01-08T05:57:48+5:30
सिरोंचा : पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटीलांची बैठक ठाणेदार अजय अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली. बैठकीत दारूमुक्त निवडणुकीसंदर्भात ...
सिरोंचा : पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटीलांची बैठक ठाणेदार अजय अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली. बैठकीत दारूमुक्त निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे १८ गावांच्या पोलीस पाटलांनी सांगितले.
यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील दारू विक्रेत्यांची यादी करण्यात आली. गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. उमेदवारांचे वचननामे वाचून दाखविण्यात आले. निवडणुकी दरम्यान दारूचे वाटप होऊ नये, गावात दारूसाठा ठेवू नये, यासाठी परिश्रम घ्यावेत. गावात दारू येत असल्याची माहिती मिळताच ताबडतोब पोलीस विभागाला कळविण्यात यावे, अशा सूचना पोलीस पाटील यांना देत विविध योजनांची माहिती ठाणेदार अजय अहीरकर यांनी दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सालोटकर, पोलीस उपनिरीक्षक कांदे, मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होती.