युवकांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:15+5:302021-08-26T04:39:15+5:30
रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांच्या पुढाकाराने पोलीस मदत केंद्रामध्येच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू ...
रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांच्या पुढाकाराने पोलीस मदत केंद्रामध्येच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. सदर रेगडी व एटापल्ली परिसरातील अनेक होतकरू युवक-युवती प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. यामध्ये २३ मुली व ३० मुलांचा समावेश आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना पीएसआय शिंब्रे हे मोफत पुस्तके, शूज, टी-शर्ट, पॅन्ट देत आहेत तसेच अभ्यासिकेचीही सोय केली असून, मार्गदर्शन करीत आहेत. दुर्गम भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी गडचिरोली येथे जाणे व पैसा खर्च करणे शक्य होत नाही. त्यासाठी आम्ही उत्तम दर्जाचे प्रशिक्षण येथेच देण्याचा प्रयत्न करीत असून, प्रत्येक रविवारी प्रशिक्षणार्थींची सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. परिसरातील तरुणांनी सदर प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिंब्रे यांनी केले आहे. वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू आहे.
240821\5817img-20210824-wa0000.jpg
प्रशिक्षन देतांनी रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधीकारी नंदकुमार शिंब्रे