शिक्षक बदली प्रकरणातील दोन मास्टर मार्इंडला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Published: September 26, 2016 01:29 AM2016-09-26T01:29:30+5:302016-09-26T01:29:30+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत २०१३ मध्ये झालेल्या २२० शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी

Police recruitment by two mastermind in teacher's transfer case by 4th October | शिक्षक बदली प्रकरणातील दोन मास्टर मार्इंडला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

शिक्षक बदली प्रकरणातील दोन मास्टर मार्इंडला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत २०१३ मध्ये झालेल्या २२० शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील दोन मास्टर माईंड लिपिक विजेंद्र सिंग व नचिकेत शिवणकर यांना अटक करण्यात आली. रविवारी त्यांना न्यायालयात गडचिरोली पोलिसांनी हजर केल्यावर न्यायालयाने या दोघांनाही ४ आॅक्टोबरपर्यंत १० दिवसांचीे पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात त्यांच्याकडून आणखी काही कर्मचारी, अधिकारी व तत्कालीन पदाधिकाऱ्यांचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. याप्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर २०१५ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर आॅगस्ट २०१५ पासून ७३ शिक्षकांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु सर्वांचे बयाण नोंदविल्यानंतर पुन्हा हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यानंतर उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत यांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक रुपेश शेडमाके याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर २३ आॅगस्ट २०१६ रोजी पोलिसांनी रुपेश शेडमाके याच्यावर भादंवि कलम ४२०, ४०९ व ४६८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच महिन्यात न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.
दरम्यान तपास करताना रुपेश शेडमाके याने शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात विजेंद्र सिंग व नचिकेत शिवणकर या शिक्षण विभागातील लिपिकांचा हात असल्याची माहिती पोलिसांना दिली. आपल्याकडे तात्पुरता प्रभार होता. परंतु खरा घोटाळा या दोघांनीच केला, असे शेडमाकेने सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरविण्यास सुरुवात केली. दोन्ही संशयितांच्या हालचालींवर पोलिसांची बारिक नजर होती. दोघांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर शुक्रवारी पोलीस निरीक्षक विजय पुराणिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी नचिकेत शिवणकर यास मूल येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरुन अटक केली. त्यानंतर शिवणकरकडून विजेंद्र सिंगबद्दल माहिती घेण्यात आली असता तो शेगाव येथे असल्याची खात्री पटली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी शेगाव येथे जाऊन विजेंद्र सिंग यास ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी दोघांनाही भादंवि कलम ४०९, ४२० व ४६८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रविवारी त्यांना गडचिरोली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही १० दिवसांची म्हणजे, ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात हवालदार घनश्याम रोहनकर, चिमणकर, राजू पद्मगिरीवार, टेंभुर्णे व प्रफुल्ल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली.
या दोघांना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे आणखी काही नावे बाहेर येण्याची शक्यता असून, त्यांच्यावर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यास कोणी दबाव आणला, बदलीचे बनावट आदेश काढण्यास कोण बाध्य केले, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे.
उल्लेखनिय बाब म्हणजे, शिक्षक बदली घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने रुपेश शेडमाकेला निलंबित केले होते, तर विजेंद्र सिंग व नचिकेत शिवणकर यांची अनुक्रमे कोरची व भामरागड पंचायत समितीत बदली केली होती. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Police recruitment by two mastermind in teacher's transfer case by 4th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.