पालकमंत्र्यांच्या भेटीने भारावले दुर्गम भागातील पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:00 AM2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:51+5:30
नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रावर पोहोचून तेथील पोलीस जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत: तेथील जवानांना मिठाईचे पॅकेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पोलिसांची भेट घेऊन घेऊन त्यांना दिवाळी भेट दिली. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या त्या धोडराज पोलीस मदत केंद्रातील पालकमंत्र्यांच्या या भेटीने पोलीस जवान भारावून गेले.
विशेष म्हणजे नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रावर पोहोचून तेथील पोलीस जवानांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी स्वत: तेथील जवानांना मिठाईचे पॅकेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.