पोलीस रेझिंग डे निमित्त चामोर्शी शहरात स्वच्छता अभियान
By admin | Published: January 7, 2017 01:31 AM2017-01-07T01:31:01+5:302017-01-07T01:31:01+5:30
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पोलीस व नगर पंचायत
विविध विभागांचा पुढाकार : कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी लावला झाडू
चामोर्शी : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पोलीस व नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर झाडू लावून रस्ते स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानात तहसील कार्यालय, नगर पंचायत, वन, पोलीस विभागासह विविध महाविद्यालय व शाळा आदींनी पुढाकार घेतला.
नगर पंचायत कार्यालयापासून आठवडी बाजार, बाजारपेठ, लक्ष्मी गेट परिसर, बायपास तहसील रोड, पंचायत समिती रोड ते आष्टी-मूल टी-पार्इंट व शहराच्या इतर परिसरात स्वच्छत मोहीम राबविण्यात आली. यात तहसील कार्यालय व वनविभागाचे कर्मचारी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, नगर पंचायत व पोलीस कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगर पंचायतीचे सभापती शातलवार, सभापती सुमेध तुरे, सविता पिपरे, सुनीता धोडरे, नगरसेवक वैभव भिवापुरे, मीनल पालारपवार, रोशनी वरघंटे, मंदा सरपे, कविता किरमे, मंजूषा रॉय, अविनाश चौधरी, वनपरिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे, क्षेत्रसहायक टोकला, वैद्यकीय अधिकारी चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सचिन गावडे, प्रभाकर कापुरे, निशा खोब्रागडे, प्रा. भुरभुरे, प्रा. म्हस्के आदी उपस्थित होते. या अभियानामुळे चामोर्शी शहरातील सर्व रस्ते व परिसर स्वच्छ झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
न. पं. परिसरात वृक्षारोपण
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त चामोर्शी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रस्ता व मुख्य परिसरातील कचरा संकलित करण्यात आला. सदर कचरा ट्रॅक्टरद्वारे शहराच्या बाहेर फेकण्यात आला. त्यानंतर नगर पंचायत कार्यालय परिसरात अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण केले. यावेळी वृक्ष संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला.