पोलिसांचे कार्य प्रशंसनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:20 AM2018-03-30T00:20:16+5:302018-03-30T00:20:16+5:30

केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली पोलीस दलाचे जवान या भागाची नक्षलग्रस्त म्हणून असणारी ओळख पुसण्याचे काम करीत आहेत.

Police work is laudable | पोलिसांचे कार्य प्रशंसनीय

पोलिसांचे कार्य प्रशंसनीय

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन : भामरागड येथे महिलांना शिलाई मशीनचे वाटप

ऑनलाईन लोकमत
भामरागड : केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली पोलीस दलाचे जवान या भागाची नक्षलग्रस्त म्हणून असणारी ओळख पुसण्याचे काम करीत आहेत. सोबतच नागरिकांना उपजीविकेसाठी सहाय्य करतात. हे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात सीआरपीएफ ३७ बटालियनतर्फे नागरी कृती कार्यक्रमांतर्गत गरजू, गरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप ना. अहीर यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, खरे तर या जवानांनी देशाच्या सीमेवर असायला हवे. मात्र नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांना इतक्या दुर्गम भागात काम करावे लागत आहे. जवानांनी नक्षलवाद संपवण्यासाठी आतापर्यंत उत्कृष्ट कार्य केले, असेही ते म्हणाले.
नागरी कृती कार्यक्रमांतर्गत ४२ महिलांना तीन महिन्यांचे शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी ४० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सोबतच नववी व दहावी उत्तीर्ण झालेल्या ४० विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या कार्यक्रमास खा. अशोक नेते, अतिरिक्त पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, सीआरपीएफचे आयजी राजकुमार, डीआयजी टी.शेखर, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए.राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार कैैलास अंडिल, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, प्रकल्प अधिकारी धीरज मोरे, कृषी अधिकारी दिलीप राऊत, भाजपचे प्रकाश गेडाम, सुनील बिश्वास, ३७ सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीणा, एसडीपीओ तानाजी बरडे, ९ बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police work is laudable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.