९३५ केंद्रांवर आज लोकसभेसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:55 PM2019-04-10T23:55:32+5:302019-04-10T23:56:14+5:30

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Polling for 9th Lok Sabha today at 9 35 centers | ९३५ केंद्रांवर आज लोकसभेसाठी मतदान

९३५ केंद्रांवर आज लोकसभेसाठी मतदान

Next
ठळक मुद्दे५ उमेदवार रिंगणात । ७ लाख ७२ हजार मतदार । ४१२८ कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवारी (दि.११) ९३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. रिंगणात असेलल्या पाच पक्षीय उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३ लाख ९२ हजार १८२ पुरूष तर ३ लाख ८० हजार ७६८ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ३२०६ नवमतदार असून ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीच्या रिंगणात पाच भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे हे पाच उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये आहे. गेल्यावेळीही याच दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन नेते यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. यावेळी ही लढत अटीतटीची असल्याचे वातावरण आहे.
गडचिरोलीत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मतदान कर्मचाऱ्यांना बुधवारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसह केंद्रावरील साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर हे कर्मचारी विविध वाहनांनी आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले. त्यांना पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांसह खासगी ट्रॅव्हल्स बसेस आणि काळीपिवळी टॅक्सींही भाड्याने घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात अल्पदृष्टी असलेले ३५१, मुकबधीर ३०८, शारीरिक अपंग १३६५ आणि इतर १७२ असे एकूण २१९६ दिव्यांग मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. शारीरिक दिव्यांगासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १३४, आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४९, अहेरी विधानसभा क्षेत्रात १३३ अशा एकूण ३१६ व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदान करता येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही राहणार आहे.

४२१ केंद्र संवेदनशील
जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांपैकी ४२१ मतदान केंद्र संवेदनशिल व अतिसंवेदनशिल आहेत. नक्षलवाद्यांना त्या भागात कोणत्याही अनुचित घटना घडविण्यात यश येऊ नये यासाठी पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ यांच्याकडे विविध भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदान दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या कर्मचाºयांना मंगळवारी अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयातून तर बुधवारी काही कर्मचाºयांना गडचिरोली व देसाईगंज येथून हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले. तेथून पोलीस संरक्षणात हे कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले.

दिव्यांगांच्या मदतीसाठी २१० स्वयंसेवक
मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांना मतदानासाठी मदत व्हावी म्हणून एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट-गाईडच्या २१० विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून ठेवले जाणार आहे. याशिवाय १६४ केंद्रांवर ३६५ व्हिलचेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८१४ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्थाही करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

वृद्ध, गरोदर महिलांची विशेष काळजी
मतदान करण्यासाठी येणारे वृध्द नागरिक, गरोदर व स्तनदा माता या मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु न देण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले.

Web Title: Polling for 9th Lok Sabha today at 9 35 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.