गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये गुरूवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले.

By admin | Published: February 17, 2017 01:14 AM2017-02-17T01:14:49+5:302017-02-17T01:14:49+5:30

यावेळी अनेक मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव,

Polling was held in eight talukas of Gadchiroli district on Thursday in the first phase. | गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये गुरूवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये गुरूवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले.

Next

गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये गुरूवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी अनेक मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, चामोर्शी तालुक्यातील घोट, आष्टी-इल्लूर जिल्हा परिषद मतदारसंघात एका मतदान केंद्रावर वृद्ध, अपंग मतदारांना त्यांच्या नातेवाईकांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर आणले. घोट येथील वृद्ध महिलेला मतदान केंद्रावर नेताना नातेवाईक, आष्टी येथील वृद्ध मतदाराला मतदान केंद्रावर नेताना त्यांचे सहकारी कुटुुंबीय, आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या अरसोडा मतदान केंद्रावर १०० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्ध महिलेला मतदानासाठी तिच्या नातेवाईकांनी मतदान केंद्रावर आणले होते. मतदान करण्यासाठी वृद्ध व अपंग मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. लोकमतच्या चमूने टिपलेले हे छायाचित्र.

Web Title: Polling was held in eight talukas of Gadchiroli district on Thursday in the first phase.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.