श्रमदानातून तलाव निर्मिती
By admin | Published: May 28, 2016 01:31 AM2016-05-28T01:31:34+5:302016-05-28T01:31:34+5:30
येथून २० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली येथील ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणीतून तलाव बांधण्याचा निर्णय घेतला असून
१५ एकर जमीन दान : मरपल्लीवासीयांचा निर्धार
जिमलगट्टा : येथून २० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली येथील ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणीतून तलाव बांधण्याचा निर्णय घेतला असून या कामाचा शुभारंभ गुरूवारी नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मरपल्ली हे गाव अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात मोडते. मागील १५ वर्षांपासून गावातील नागरिकांनी तलाव बांधून देण्याची मागणी प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली होती. मात्र याबाबतची दखल घेण्यात आली नाही. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या मरपल्ली येथील शेतकऱ्यांनी सभा घेऊन विचारविनिमय करून सर्वानुमते लोकवर्गणीतून तलाव निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. तलावासाठी लागणारी १५ एकर जमीन शेतकऱ्यांनी दान दिली आहे. तलावाचे बांधकाम झाल्यास २५० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तलावाची लांबी ७५० मीटर राहणार आहे. तलावाचे बांधकाम योग्य व्हावे, यासाठी अभियंत्याची नेमणूक केली आहे. जवळपास एक ते दीड कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मोहमद आसिम मोहमद याकूब यांनी १० एकर, व्यंकटी कुमरे दीड एकर, पेंटा पोचा कुमरे एक, बानपा बापू कुमरे एक एकर, पुलका मरूया बोरकूट यांनी दीड एकर जमीन तलावासाठी दान दिली आहे.