महालाच्या प्रांगणातील गणरायाची पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा
By admin | Published: September 11, 2016 01:31 AM2016-09-11T01:31:32+5:302016-09-11T01:31:32+5:30
अहेरी राजनगरीतील रूख्मिणी महालासमोर राजपरिवाराच्या वतीने श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.
अहेरी राजनगरीतील रूख्मिणी महालासमोर राजपरिवाराच्या वतीने श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यंदा हे श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापणेचे पाचवे वर्ष आहे. अहेरीचे राजे व राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी श्रीगणेशाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य राणी रूख्मिणीदेवी, बंधू अवधेशरावबाबा उपस्थित होते. तिरूपती बालाजीच्या प्रतिकृती हे गणराज विराजमान झाले आहेत. मागील १५ दिवसांपासून कलकत्ता येथील कारागिरांनी ओडिशा येथील प्रसिध्द मंदिराची उभारणी केली. राजवाडा परिसरातील हा गणपती अहेरीचा राजा म्हणून उपविभागात ओळखला जातो. येथील देखावे व सजावट पाहण्यासाठी अहेरी उपविभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.