देसाईगंज-कोहमारा मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:31+5:302021-05-18T04:37:31+5:30
देसाईगंज : देसाईगंज-कोहमारा या राष्ट्रीय महामार्गावर मागील दोन वर्षांपासून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे. या ...
देसाईगंज : देसाईगंज-कोहमारा या राष्ट्रीय महामार्गावर मागील दोन वर्षांपासून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देसाईगंज-कोहमारा या राष्ट्रीय महामार्गाचे डागडुजीचे काम मागील दोन वर्षांपासून देसाईगंज सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिपत्याखाली सुरू आहे. असे असताना सदर विभागातर्फे सदर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटलावर गोंदिया- गोरेगाव-सडक / अर्जुनी-कोहमारा या नावाने ओळखला जाताे. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ दिसून येते. दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनेही या मार्गाने नेहमी आवागमन करीत असतात. या मार्गाने सरळ मार्गी गोंदिया, काेलकात्याकडे जाण्यास सोयीचे असल्याने यामार्गे मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते.