मुरखळा-कान्हाेली मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:19+5:302021-05-23T04:36:19+5:30
मुरखळा-कान्हाेली मार्गाचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले; मात्र रस्ता मजबुतीकरणासंबंधी अजूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही. ...
मुरखळा-कान्हाेली मार्गाचे काही वर्षांपूर्वी खडीकरण करून डांबरीकरण करण्यात आले; मात्र रस्ता मजबुतीकरणासंबंधी अजूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही. त्यामुळे सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे, रस्त्याआड झाडेझुडपे वाढली आहेत. अशाही परिस्थितीत या मार्गावर गडचिरोली आगाराची बससेवा सुरू होती. मुरखळा गावाबाहेर मार्गावर रस्त्यालगत शेणखत ढिगारे असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे १० फुट रुंद रस्ता केवळ ५ फूट उरला आहे. शेणखताच्या ढिगांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. याच मार्गावर लोकमान्य विद्यालय असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रात ये-जा करताना अडचणी येतात. शेणखत ढिगाऱ्यांची दोन-तीन वर्षांपासून उचल केली नसल्याने त्याचा आकार वाढत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
200521\img-20210520-wa0106.jpg
===Caption===
दुरवस्थेत असलेला मुरखळा-कान्हाेली रस्ता.