पातागुडम-काेर्ला मार्गाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:50+5:302021-01-21T04:32:50+5:30
सिराेंचा : तालुक्यातील शेवटच्या टाेकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पातागुडम परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पातागुडम-काेर्ला या ...
सिराेंचा : तालुक्यातील शेवटच्या टाेकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पातागुडम परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गाची माेठ्या प्रमाणात स्थिती दयनीय आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पातागुडम व काेर्ला ही गावे अतिशय संवेदनशील भागात आहेत. जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भागात आधीच हा परिसर अविकसित आहे. त्यातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रहदारीस अडथळा येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टाेकावरील इंद्रावती नदीच्या टाेकावर पातागुडम हे गाव आहे. पातागुडम-काेर्ला या मार्गावरुन नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती झाल्यास पातागुडम, रायगुडम, पेंडलाया, साेमनपल्ली, काेप्पेला आदी गावांसह छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकते. काेर्ला समाेरुन देचलीपेठा ते जिमलगट्टा दरम्यान नाल्यावर पुलाचे बांधकाम झाल्याने देचलीपेठा व काेर्ला तसेच जिमलगट्टामार्गे बारमाही जाेडले आहे. पातागुडम जवळील इंद्रावती नदीवर पूल बांधल्याने येथून वाहनांची वर्दळ पाहावयास मिळते.
परंतु पातागुडम-काेर्ला मार्गाची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना सिराेंचाला येऊन अहेरी व गडचिराेली मार्गे प्रवास करावा लागताे. यात बराच वेळ वाया घालवावा लागताे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता व पुलाचे बांधकाम करुन रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्नीक पातागुडमला भेट देऊन जवानांसाेबत दिवाळी साजरी केली हाेती. मात्र अद्यापही या मार्गाचे नूतनीकरण झाले नाही.