देसाईगंज तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:10+5:302021-06-18T04:26:10+5:30

शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरीच्या लाभामुळे अनेक शेतकरी कृषिपंपांचा वापर करून शेतातून विविध पिकांचे उत्पादन घेतात. ...

Poor condition of transformer in Desaiganj taluka | देसाईगंज तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था

देसाईगंज तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था

Next

शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरीच्या लाभामुळे अनेक शेतकरी कृषिपंपांचा वापर करून शेतातून विविध पिकांचे उत्पादन घेतात. परंतु विद्युत लाइनची देखभाल तसेच दुरुस्ती करणारे कर्मचारी अपुरे असल्याने तसेच एका लाइनमकडे अनेक गावांची जबाबदारी दिली असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्युज उडणे ही समस्या उद्भवते. यामुळे सिंचन सुविधा प्रभावित होते. ओव्हरलोडने फेज आपाेआप उडतात; परंतु वारंवार हीच समस्या उद्भवत असताना फेजबाबत न समजणारे गावाेगावातील व्यक्तीच पुन्हा जाऊन फेज टाकतात. काही दिवसांनंतर पुन्हा तीच समस्या निर्माण हाेते. अनेक ट्रान्सफॉर्मरमधील चिनीमातीचे फेज तुटलेफुटले आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाइनमनकडे असलेला अधिक गावांचा अतिरिक्त भार काढून त्या-त्या ठिकाणी आवश्यक लाइनमन नियुक्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

कुलूपबंद व्यवस्था निर्माण करा

बिघाड आल्यास शेतकऱ्यांना वेळेवर लाइनमन उपलब्ध होत नसल्याने पर्यायाने कृषिपंपाच्या ट्रान्सफॉर्मरची हाताळणी करणाऱ्या गावातीलच व्यक्तीला साेबत घेतले जाते. आजच्या घडीला डीपी बाॅक्समधील फ्युज लाॅकसिस्टिमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे सताड उघडे राहून असुरक्षित व धाेकादायक ठरत आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या आतील जळालेले फेज बदलून त्या जागी नवीन फेज लावून कुलूपबंद व्यवस्था करावी.

Web Title: Poor condition of transformer in Desaiganj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.