गरीब कुटुंबांना मिळणार दर्जेदार आरोग्यसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:50 PM2018-09-24T22:50:20+5:302018-09-24T22:50:41+5:30
आपल्या प्राप्तीपेक्षा अचानक उद्भवलेल्या आजारावर खर्च मोठ्या प्रमाणावर संभवतो. गरीब व्यक्तीला आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. याची जाणीव ठेवून भारत सरकारने देशात प्रधानमंत्री महत्वाकांक्षी जन आरोग्य योजनेअंतर्गत वार्षीक पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करुन दिलेले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबियांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आपल्या प्राप्तीपेक्षा अचानक उद्भवलेल्या आजारावर खर्च मोठ्या प्रमाणावर संभवतो. गरीब व्यक्तीला आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. याची जाणीव ठेवून भारत सरकारने देशात प्रधानमंत्री महत्वाकांक्षी जन आरोग्य योजनेअंतर्गत वार्षीक पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करुन दिलेले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबियांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीस वार्षीक पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण अनुज्ञेय आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४८ हजार ३३६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या रुग्णालयांपैकी सुरुवातीला ८० शासकीय रुग्णालयामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु करण्यात येत आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १ हजार ३४९ आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार नेते म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीला होत असून त्या कुटूंबातील सर्व व्यक्तींना विशेष करुन याचा लाभ होईल. या योजनेत १ हजार ३४९ विविध आजाराचा समावेश केल्यामुळे आता आपल्या देश बलशाली/ स्वस्थ होण्यास वेळ लागणार नाही. आरोग्य विभागानी मानवतेचा दृष्टिकोण ठेवून रुग्णांना सेवा प्रदान करावी. यामध्ये फॉर्म भरण्यापासून उपचार होईपर्यंत रुग्णाला सहकार्य करावे, आवाहन त्यांनी यावेळी केले. जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर म्हणाल्या, तळागाळातील नागरिकांपर्यंत ही योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. माणसाची खरी श्रीमती म्हणजे त्याचे आरोग्य होय. तेव्हा कुटुंबातील व्यक्तीनी आॅनलाईन फॉर्म भरुन नोंदणी करावी त्यासोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला योग्य मार्गदर्शन करुन उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह विशेष करुन आशा वर्कर यांना उद्देशून म्हणाले की, आपण केलेल्या एप्रिल- मे महिन्यातील रुग्णांची यादी तयार झाली आहे. कुटूंबातल्या सर्वांनाच याचा लाभ मिळणार असल्यामुळे आपण सेवा देत असताना याची माहिती रुग्णापर्यंत पोहोचवावी. रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत सेवा देत असतानाच शेजारील कोणत्याही राज्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन घेता येईल. तेव्हा आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व अधिकाºयांनी व्यवस्थीत माहिती द्यावी, त्याशिवाय या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना पदरी पाडून घेता येणार नाही. आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, मानवतेच्या दृष्टीने आरोग्याशी संबंधित असणाºया या योजनेची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे. देशाला जगात बलशाली बनविण्यासाठी सर्वांचे आरोग्य स्वस्थ असणे आवश्यक आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत लाभार्थ्यांची याची चुकीची तयार झाली असल्याचे ते म्हणाले. आर्थिकदृष्ट्या सबळ असणाºया कुटुंबांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे अत्यंत दुर्बल घटकात असणाºया कुटुंबाचे नाव बीपीएलच्या यादीत नाही. त्यात विशेष बाब म्हणून दुरुस्ती करुन त्यांना त्यांचा लाभा खºया अर्थाने मिळवून द्यावा असे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील रांची येथे आयोजीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा सूचना अधिकारी शिवशंकर टेंभूर्णे यांनी सादरीकरणाव्दारे प्रक्षेपीत केले. पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, संचालन विशाखा काटवले आणि लिलाधर धाकडे यांनी केले तर डॉ.बागराज धुर्वे यांनी आभार मानले.