मूल्यवर्धनातून सकारात्मक बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्टÑात नाव मिळविले आहे. दुष्काळ निवारण, शैक्षणिक ...

Positive changes from value added | मूल्यवर्धनातून सकारात्मक बदल

मूल्यवर्धनातून सकारात्मक बदल

Next
ठळक मुद्देजि.प.सीईओंचे प्रतिपादन । जिल्हा मेळाव्यातून जाणली फलनिष्पत्ती




लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्टÑात नाव मिळविले आहे. दुष्काळ निवारण, शैक्षणिक जनजागृती व इतर कामे प्रभावीपणे केली आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमातून जि.प. शाळा व त्यातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत, असे प्रतिपादन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्टÑ पुणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जि.प. हायस्कूललगतच्या सभागृहात शनिवारी मूल्यवर्धन जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे प्रमुख शांतीलाल मुथ्था, गडचिरोली जिल्हाध्यक्ष निरज बोथरा, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, डायटचे अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, वैशाली एगलोपवार, महेंद्र मंडलेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी मुनघाटे, पाटील यांनीही जि.प. शाळांमध्ये सुरू असलेल्या मूल्यर्वधन उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्याला जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शांतीलाल मुथ्था, संचालन प्रज्ञा साखरे यांनी तर आभार वैशाली एगलोपवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजन बोरकर, डायटचे डॉ. विजय रामटेके, प्रभाकर साखरे, कुणाल कोवे, प्रदीप पाटील यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांमध्ये
मूल्य व कौशल्य विकासावर भर-मुथ्था
गडचिरोली जिल्ह्यात जि.प.च्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मूल्यवर्धन उपक्रम सातत्याने सुरू आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, कौशल्य व क्षमता रूजवून भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन शांतीलाल मुथ्था यांनी यावेळी केले. दरम्यान त्यांनी याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षकांशी संवाद साधून सदर मूल्यवर्धन उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद, घडून येणारे बदल आदी बाबतची माहिती जाणून घेतली.

Web Title: Positive changes from value added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.