सकारात्मकतेतून आत्मविश्वास वाढतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:02 AM2018-10-29T01:02:14+5:302018-10-29T01:03:25+5:30
जीवनात अनेकदा यश अपयश येत असते. अपयशाला खचून न जाता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आलेले अपयश दूर करून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास बळकट करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जीवनात अनेकदा यश अपयश येत असते. अपयशाला खचून न जाता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आलेले अपयश दूर करून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास बळकट करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. यातून आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.
कन्हारटोला येथे नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. उद्घाटन कुरखेडाचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अॅड. उमेश वालदे, सरपंच रेखा ब्रम्हनायक, उपसरपंच अशोक उसेंडी, ग्रा. पं. सदस्य सदाराम होळी, दिवाकर मारगाये, डॉ. परिहार, प्रा. बोडणे, प्रा. शिवणकर, राजेश आचला, तीर्थराम रोकडे, रामचंद्र सागसुरवार, हातमोडे, रामटेके, उमाजी करमकार उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक हेटीनगर, द्वितीय आरिकोजारी, तृतीय गोठणगाव तर एकल स्पर्धेत प्रथम क्रमांक देवरी तालुक्यातील बोरगाव, द्वितीय क्रमांक फुटाणा तर तृतीय क्रमांक येरडी येथील स्पर्धकांनी पटकाविला. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन सयाम, प्रास्ताविक नारद फुलकंवर तर आभार वासुदेव पुडो यांनी पटकाविला. कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.